करमाळा (सोलापूर) : प्रो ऍक्टिव्ह अबॅकसच्या वतीने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत जेऊरमधील जिनियस अबॅकस क्लासच्या गुणवंतांचा सत्कार झाला. यामध्ये विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात जिनियस अबॅकस क्लासेसच्या 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
रिजनल अबॅकस परीक्षेत तेजस्विनी भिलारे हिने सहा मिनिटात १०० गणिते सोडून प्रथम तर श्रीजय मदने याने 98 गणिते सोडवत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच वेदांत गोडगेने, प्रांजली भिलारे व जान्हवी शहाने द्वितीय क्रमांक मिळवला. श्रेया मारकडने तृतीय व श्रुतिका पोटे, श्रेया पोटे यांनी चतुर्थ क्रमांक व अंजली भिलारेने पाचवा क्रमांक मिळवला.
नऊ विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथील इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली. याबरोबर जिनियस अबॅकस क्लासचे अथर्व पोटे, स्नेहल पोटे, तेजस भिलारे, वैभव भिलारे, रीया चौगुले, श्रुती गुंडगिरे, अवनीश गुड, मोहम्मद साद शेख, पृथ्वीराज वाघमोडे, उत्कर्ष मंजरतकर, तनिष्का राखुंडे, आराध्या वेदपाठक, उमेरा फकीर यांनी गोल्ड मेडल मिळून यश संपादन केले. या मुलांचा सन्मान यश कल्याणी सेवाभावी संस्थेत झाला.
अतुल दाभाडे, डॉ. निलेश मोटे, प्रा. विष्णू शिंदे, प्रा. जयेश पवार, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, डॉ. स्वाती बिले, राजकुंवर पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणी सेवाभावी संस्थेचे प्रा. गणेश करे पाटील होते. डॉ. स्नेहल शहा, रेश्मा गोडगे, निशा मदने यांनी मनोगत व्यक्त केले. क्लासच्या संचालिका अंकिता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.