करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील एका मोठ्या गावात एकाने मुलीची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सबंधित व्यक्ती ही ग्रामपंचायत सदस्य असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. करमाळा पोलिस ठाणे परिसारत याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजत आहे. याप्रकरामुळे संबंधित गावात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित संशयित आरोपी हा तालुक्यातील एका गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. संशयित आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण गावातील नागरिक एकवटले असून या घटनेचा नागरिकांनी निषेध केला आहे. गावकरी म्हणून अन्यायग्रस्त कुटुंबाच्या मागे आम्ही उभे राहणार असून त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आणि पुन्हा गावात अशी घटना घडू नये म्हणून संशयितावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान याबाबत कायदेशीररित्या कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची उलट-सुलट चर्चा आहे. अधिकृतपणे बोलण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. (या बातमीमुळे कोणाला त्रास व्हावा हा उद्देश नाही. ‘असे’ गैरकृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हा उद्देश आहे. यातील व्यक्ती व गावाची ओळख जाणूनबुजून लपवली आहे. या व्यक्तीची व गावाच्या ओळखीपेक्षा असे कृत करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. अशा घटना घडल्यानंतर अन्यायग्रस्ताने पुढे आले पाहिजे. पुन्हा असे कृत्य करणाऱ्याचे धाडस होणार नाही, अशी गुन्हेगारावर कारवाई होणे आवश्यक आहे.)
करमाळा तालुक्यात मुलीची छेड?
