Give the information of the unknown person the tenant to the police stationGive the information of the unknown person the tenant to the police station

सोलापूर : फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम144 अन्वये सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा, जुने वाहन विक्री खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाडयाने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.

  1. कोणत्याही अनोळखी नवीन रहावयास येणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच सोलापूर ग्रामीण जिल्हयात जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलिस ठाणेला त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना रहावयास जागा पोलिसांना माहिती न देता उपलब्ध करुन देणे.
  2. कोणत्याही अनोळखी नवीन जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपुर्ण माहिती तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलिस ठाणेस त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनओळखी व्यक्तींची पोलिसांना माहिती न देत जुने वाहन खरेदी विक्री भाड्याने उपलब्ध करून देणे. पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या पत्रानुसार सदरचा आदेश 5 नोव्हेंबरपर्यंत सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत
    लागू राहील, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी निर्देशित केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *