करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे हद्दीत एका लॉजमध्ये बेकायदा प्रवेश देणे महागात पडले आहे. यामध्ये करमाळा पोलिसात काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. त्यात संशयित आरोपींना अटकही करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून यापुढेही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लॉज चालवण्यासाठी नियम व अटी आहेत. त्याची अंमलबजणानी झाली नाही तर कारवाई होते. काही दिवसांपूर्वी पॉस्को व ऍट्रॉसिटी अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता. त्यात संशयित म्हणून संबंधित हॉटेल चालकाविरुद्धही संशयित म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. नियमानुसार १८ वर्षाच्या पुढे वय असेल तर लॉजवर पोलिसांनी छापा टाकली आणि एखादे जोडपे सापडले तरी त्याच्यावर कारवाई करता येत नाही. मात्र नियमांचे उल्लंघन होत असले तर कारवाई केली जाते. यातूनच हा गुन्हा दाखल झाला असल्याचे समजत आहे.