Transfer of 22 officers in Pune department Langute was appointed as Pandharpur and Thokde as Tehsildar of Karmala

सोलापूर (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु आहेत. त्यात आज (शुक्रवार) पुणे विभागातील महसूल विभागाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये श्रीपूर मळा येथील शेती महामंडळाच्या स्थावर व्यवस्थापक शिल्पा ठोकडे यांची बदली करमाळ्याच्या तहसीलदार म्हणून झाली आहे. दोन महिन्यापूर्वी म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच करमाळा तहसीलचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. आता त्यांची नियुक्ती कायम झाली आहे.

करमाळ्याचे तत्कालीन तहसीलदार समीर माने यांची बदली झाल्यापासून म्हणजे एप्रिल २०२३ पासून करमाळ्याचा पदभार प्रभारी तहसीलदार म्हणून विजयकुमार जाधव यांच्याकडे होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये ठोकडे यांच्याकडे करमाळ्याचा अतिरिक्त तहसीलदार म्हणून त्यांच्याकडे पदभार आला होता. आता त्यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे.

पुणे विभागातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्हा करमणूक कर शाखेचे तहसीलदार पांडुरंग पवार यांची बदली सोलापूर येथे विशेष कार्याधिकारी म्हणून झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार अर्चना निकम यांची बदली सोलापूर येथे निवडणूक विभागात झाली आहे. पुणे येथील पुणे नागरी समूहच्या तहसीलदार सुनीता आसवले यांची बदली श्रीपूर मळा येथे झाली आहे. पुणे येथील उजनी प्रकल्पच्या सहाय्यक पुनर्वसन अधिकारी सुरेखा दिवटे यांची बदली कोल्हापूर येथे झाली आहे.

पुणे येथील सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी (फिरते पथक) अर्पणा तांबोळी यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे. सातारा येथील पुनर्वसनच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांची बदली सांगली जिल्ह्यातील पलूसच्या तहसीलदारपदी झाली आहे. सांगलीच्या अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांची बदली कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथे झाली आहे. अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांची बदली पुणे येथे झाली आहे.

सोलापूर येथील महसूलचे तहसीलदार डी. व्ही. मोहोळ यांची बदली इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळ येथे झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगडचे तहसीलदार अश्विनी वरूटे यांची बदली सांगली येथे अप्पर तहसीलदार म्हणून झाली आहे. उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांची बदली कोल्हापूर येथे करमणूक कर अधिकारी म्हणून झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडाच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यातील उजनी प्रकल्पाचे सहायक पुनर्वसन अधिकारी म्हणून झाली आहे. कोल्हापूर येथील जयवंत पाटील यांची बदली धाराशिव जिल्ह्यातील भूमचे तहसीलदार म्हणून झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महसूलच्या तहसीलदार सरस्वती पाटील यांची बदली सोलापूरचे पुनर्वसनचे तहसीलदार म्हणून झाली आहे.

कोल्हापूर येथील करमणूक करचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीचे तहसीलदार म्हणून झाली आहे. पुणे येथील नागेश गायकवाड यांची बदली सातारा येथे झाली आहे. पुणे येथील विकास भालेराव यांची बदली सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ येथे झाली आहे. सातारा येथील पुनर्वसनचे तहसीलदार अमर वाकडे यांची बदली कोल्हापूर येथील कांगलचे तहसीलदार म्हणून झाली आहे. इंदापूर येथील शेती महामंडळाचे सचिन लांगुटे यांची बदली पंढरपूर येथे झाली आहे. पुणे येथील निवडणूक शाखेचे तहसीलदार उज्वला सोरटे यांची बदली पुणे येथे नागरी समूहाचे तहसीलदार म्हणून झाली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *