करमाळा (सोलापूर) : गणेशोत्सवानिमित्त गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये भव्य मोदक स्पर्धा व रांगोळी स्पर्धा झाल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश करे पाटील यांची उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम नर्सरी ते पहिलीच्या महिला पालकांसाठी ठेवण्यात आला होता. आजच्या या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात २०० महिला पालकांनी सहभाग नोंदविला. मोदक स्पर्धेत सहभागी महिलांनी घरूनच पौष्टिक, आकर्षक, रुचकर मोदक बनवून आणले होते. तर रांगोळी स्पर्धेत सहभागी महिलांनी दिलेल्या विषयावर संदेशपर रांगोळ्या काढल्या होत्या. दोन्ही स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.
मोदक स्पर्धेतील विजेत्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे : काजल इंदुरे, विद्याराणी खंडागळे, सुदर्शना सूर्यवंशी, कांचन टेके, भाग्यश्री किरवे, राणी पडवळे, शुभांगी सरडे, गीता गोसावी, कोमल भगत, शमिना शेख यांच्यासह रांगोळी स्पर्धेत अनुराधा कातुरे, रुक्मिणी माने, प्रियंका महाडिक, अश्विनी काळे, अर्चना गांधी, अभिलाषा मुसळे या तीन महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व सौ. भोगे यांच्या हस्ते झाले. मोदक स्पर्धा परीक्षणाचे कार्य शाळेतील शिक्षक श्री. पुरी तसेच सौ. भगत व सौ. बनसोडे यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माळी यांनी केले. आभार माळवे यांनी केले.