करमाळा (सोलापूर) : भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने सूर्यपुत्र (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक करमाळा येथे सामुदायिक बुद्ध वंदना झाली.
भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळाच्या केंद्रीय शिक्षिका पुष्पाताई कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धम्मयान दिनदर्शिकाचे प्रकाशन झाले. दशरथ कांबळे, नागेश कांबळे, रमेश कांबळे, महाराजा कांबळे, माजी नगरसेवक राजू आव्हाड, जयकुमार कांबळे, बाबा घोडके, लक्ष्मण भोसले, एस. पी. कांबळे, एल. यु. कांबळे, जानराव, प्रमोद गायकवाड, संतोष कांबळे, जयवंत कांबळे, सुनील खरात आदी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव कांबळे यांनी मानले.