करमाळा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात मिरवणूक काढण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ही मिरवणूक सुरु झाली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक एम. एन. जगदाळे, साडेचे दत्ता जाधव, माजी सरपंच रेवन्नाथ पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बनकर, उपाध्यक्ष आजिनाथ इरकर, जनशक्ती शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष किशोर शिंदे, करमाळा धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष धनंजय कोळेकर, भारत पाटील, दादासाहेब नरोटे, महाराष्ट्रा चॅम्पियन महिला कुस्तीगीर पल्लवी सुपनवर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण होगले, जीवन होगले, तात्यासाहेब काळे, शंकर सुळ, गहिनाथ वीर, किशोर कांबळे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर यांनी सर्वांचे आभार मानले.
