करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू महाराज व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव विलासराव घुमरे व प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


