करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच रवींद्र वळेकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते भाऊराव वाघमारे यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर जय जिजाऊ जय शिवरायचा जयघोष करण्यात आला.
संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास वळेकर, दीपक गवळी, अण्णा सावंत, पोलिस पाटील केरबा पन्हाळकर, आर. व्ही. ग्रुपचे अध्यक्ष ईश्वर मस्के, पोपटराव वाघमारे, सौदागर वाघमारे, दत्ताभाऊ वळेकर, मधुकर तनपुरे, शंकर मस्के, राजू माळी, राजाभाऊ वळेकर, बापू वळेकर, छगन वाघमारे, ज्ञानेश्वर वळेकर, तात्या सातव, जालिंदर काकडे, दिलीप मुळे, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.