करमाळा : येथील सावंत गटाच्या कार्यालयात आज (शनिवारी) शहरातील सौदी अरेबिया येथे हाज यात्रेसाठी जाणारे हाज यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी कदीरभई शेख, इस्माईल बागवान, मौला तांबोळी, बद्रूद्दीन बागवान, बकशभई शेख या हाज यात्रेकरूंचा टोपी, हाजी रूमाल व फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, कै. नामदेवराव जगताप उर्दू प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, सामाजिक कार्यकर्ते वाजीद शेख, छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग सावंत, मैनुद्दीन बेग, मैनुद्दीन शेख, समीर वस्ताद, साजीद बेग, माजीद शेख आदी उपस्थित होते.