करमाळा (सोलापूर) : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत नामदेव शिंपी समाज करमाळा यांच्याकडून हरिनाम सप्ताह होणार आहे. या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ९ ते १५ जुलैदरम्यान हरिनाम सप्ताह होणार आहे.
या सप्ताहमध्ये दररोज हरिपाठ, भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हभप आगम महाराज (जेऊर) तर किर्तनसोबत खोलेश्वर भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, गोरोबा का भजनी मंडळ, करमाळा मृंगाचार्य शुभम शहाणे, नंदु घडगे, सुधा करंडे, धनय शेळके, हर्मोनियम पांडुरंग जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. शनिवारी (ता. १५) श्री संत नामदेव शिंपी महाराज व परिवार व संत जनाबाईयांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हभप मनसुख महाराज दहे (श्रीरामपुर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. विश्वस्त रमेश गानबोटे व गानबोटे परिवार करमाळा यांच्याकडून महाप्रसाद देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती सागर =वडे यांनी दिली आहे.