करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मिरगव्हाण येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पाटील यांनी आर्जुनगर येथेही भेट दिली. तेव्हा माजी सरपंच अनिल थोरात यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले.

