करमाळा (सोलापूर) : समोरील खिडकी बंद का आहे, असे फोन करून का विचारले याचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात घडला आहे. यामध्ये कंदर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात एका महिलेने फिर्याद दिली आहे. सागर काशिनाथ तांदळे व सौरभ भीमराव ननवरे (रा. कंदर, ता. करमाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.
फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, ‘गावात घराजवळ संशयित आरोपी तांदळे व ननवरे हे कुटुंबासह राहतात. त्यांनी ‘तु रमेश लष्कर यास समोरील खिडकी बंद का आहे, असे फोन करून का विचारले’ याचा राग मनात धरून पतीला शिवीगाळ करत मारहाण केली.’ यामध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.