करमाळा (सोलापूर) : कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढिवसानिमित्त सीना नदीच्या पूरग्रस्त नागरिकांना करमाळ्यात संतोष वारे यांच्या माध्यमातून एकवेळचे जेवण व चहा नाश्ता देण्यात आला. याबरोबर बाधित व काही गरजू नागरिकांना किराणा किट व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
करमाळा तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे नागरिकांचा संघर्ष सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. याबरोबर अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने संसार उध्वस्त झाले आहेत. सीना नदीमुळे करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, तरटगाव, बिटरगाव श्री, पोटेगाव, निलज, बाळेवाडी, बोरगाव, पोथरे, खांबेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी गेल्याने नुकसान झालेल्या नागरिकांना मदत म्हणून किराणा कीट देण्यात आले. याबरोबर स्थलांतरित केलेल्या नागरिकांना महामुनी मंगल कार्यालय व आंनदी मंगल कार्यालय येथील नागरिकांना एकवेळचे जेवण व चहा नाश्ता देण्यात आला.