सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी (ता. २७) सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 6.30 वाजता ते कोथरूड (पुणे) येथून वाहनाने सोलापूरकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी 12 वाजता सोलापूर येथून वाहनाने बार्शीकडे त्यांचे प्रयाण असून दुपारी 1 वाजता बार्शी येथे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव असून दुपारी 3 वाजता बार्शी येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण करतील.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर दौरा
