तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते करमाळा तहसील कार्यालयात प्रशासकीय ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय येथे स्वातंत्र दिनानिमित्त तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते प्रशासकीय ध्वजारोहण झाले. पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गट विकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे, महसुलाचे नायब तहसीलदार काझी, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे, सावंत गटाचे सुनील सावंत, भाजपचे दीपक चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या निलावती कांबळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दक, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, ऍड. गोवर्धन चवरे, फारूक जमादार, माजी नगरसेवक संजय सावंत आदी उपस्थित होते. येथे करमाळा पोलिस व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *