करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या जेऊर व माढा स्थानकावर सोलापूर- पुणे या हुतात्मा एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे धैर्यशिल मोहिते पाटील यांनी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सोलापुरातील प्रवाशांसाठी सोयीचे असलेल्या जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या जास्त असते. पुणे येथे अनेक विद्यर्थी, व्यापारी व नोकरदार ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जेऊर व माढा रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे. हा थांबा मिळाल्यास या शहरातील व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल, असे धैर्यशिल मोहिते- पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.