करमाळा (सोलापूर) : ड्रायक्लीनर्समध्ये आणलेल्या कपड्याच्या खिशात सापडलेले पैसे संबंधिताला देऊन प्रामाणिकपणा जपला असल्याचा प्रकार करमाळा शहरात समोर आला आहे. अर्जुननगर येथील चत्रभुज घाडगे यांनी करमाळा शहरातील किल्ला वेस येथील गजराज ड्रायक्लीनर्समध्ये ड्रायक्लिनला कपडे टाकली होती. त्यात एका पॅंटच्या खिशामध्ये 8 हजार 382 रुपये होते. ही रक्कम ड्रायक्लीनर्सचे मालक सुधीर सावरे व संदीप सावरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वडिलांना संपर्क साधून घाडगे यांची रक्कम परत केली. ही रक्कम अर्जुननगर येथील मरीआईच्या जत्रेची वर्गणीतून शिल्लक राहिलेली होती.

