करमाळा : येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कार्यालयातील मुख्य लिपिक विक्रमसिंह सुर्यवंशी व कनिष्ठ विभागातील वाणिज्य विभागाच्या संध्या बिले या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. यांच्या सेवापूर्तीनिमित्त सचिव विलासराव घुमरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. यांनी उर्वरित आयुष्य आनंदात जावे सुखाने समृद्धीने घालावे अशा शुभेच्छा दिल्या.

घुमरे म्हणाले, हे दोन्हीही सदस्य सेवेतून निवृत्त होत असले तरी यशवंत परिवाराचे आजीव सभासद राहतील. कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक आणि कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एम. डी. जाधव यांनी केले तर आभार प्रा. नितीन तळपाडे यांनी मानले.



