मध्य रेल्वेच्या चेन्नई- मुंबई मार्गावरील करमाळा तालुक्यातील केम हे सर्वात मोठे गाव! कुंकासाठी सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या या गावात केळी, द्राक्ष, ऊसाचे उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग येथे शेतकऱ्याने केला आहे. सर्वांच्या हातात स्मार्ट फोन आल्याने प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतो, असे असतानाही केम सारख्या गावात पत्रकारांचा सन्मान होणे ही पत्रकारांचा उत्साह वाढवणारी बाब आहे. उत्तरेश्वर युवा परिवर्तन आघाडीने हा कार्यक्रम घेतला होता. पहिल्यांदाच येथे हा कार्यक्रम झाला आहे. केमच्या मध्यवर्ती ठिकाणी हा सन्मान सोहळा झाला.
अच्युत पाटील, संदीप तळेकर, महावीर तळेकर, सागर दोंड, परमेश्वर तळेकर, गणेश पवार, विष्णू पारखे, बाळासाहेब देवकर, आंनद शिंदे, महेश तळेकर, वर्षाताई चव्हाण, अनवरबी मुलाणी, सुभाष कळसाईत, बापू तळेकर, सतीश खानट, शिवाजी पाटील, संजय देवकर, दिलीप दोंड, महादेव पाटमास, धंनजय ताकमोगे, सचिन रणशृंगारे, विलास बिचितकर आदींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संभाजी ब्रिगेड प्रमुख नितीन खटके, राष्ट्रवादीचे दत्ता गवळी, अरुण लोंढे, दादासाहेब गोडसे, अजिनाथ लोखरे, गोरख जगदाळे, पिंटू ओहळ, सागर कुर्डे, निखिल तळेकर, विष्णू अवघडे, दत्तात्रय बिचिटकर, योगेश ओहळ, शिवाजी मोळीक, पांडुरंग तळेकर, रागू कोंडलकर, सुनील कोंडलकर, राहुल कोंडलकर, नामदेव पालवे, रमेश कोंडलकर, बबलू धोत्रे, बिनु कोंडलकर, बंडू कोंडलकर यांच्यासह करमाळा तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.
‘दिव्य मराठी’चे पत्रकार विशाल घोलप, ‘करमाळा चौफेर’चे शंभूराजे फरतडे, ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचे अशोक मुरूमकर, ‘संचार’चे पत्रकार किशोर शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांपुढील आव्हाने आणि सामाजिक दृष्टिकोन यावर मनोगत व्यक्त करतानाच केमसह तालुक्यामधील प्रश्न मांडण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सकारात्मक दृष्टी ठेऊन समाजासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याची भावना यावेळी मनोगतातून व्यक्त करण्यात आली.