करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (सोमवारी) दुसऱ्यादिवशीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा दौरा काढला आहे. दिवसभरात २० गावांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्याचे त्यांचे नियोजन असून या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
आमदार शिंदे यांनी शेलगाव येथून सकाळी ८ वाजता दौरा सुरु केला आहे. प्रत्येक गावात अर्धातास वेळ ठेवला आहे. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. शिवाय केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना दिली जात आहे. शेलगाव, वांगी १, २, ३ व ४, बिटरगाव वा, भिवरवाडी, ढोकरी, दहिगाव, जेऊरवाडी, पोफळज, उमरड, सोगाव पुर्व व पश्चिम, रिटेवाडी, मांजरगाव, राजुरी, उंदरगाव, वाशिंबे व गोयेगाव आदी गावात भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. यावेळी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही ते सांगत आहेत.
शेलगाव (वां) येथे हनुमान मंदिराची पाहणी करून लवकरच हे काम सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी विजेसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. दलित वस्ती येथे बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. माजी सरपंच राजाभाऊ बेरे, रायचंद खाडे, हिरालाल कोंडलकर, माजी संचालक दिलीप केकान, दादासाहेब काटे, युवराज काळे, अनिल केकान, तात्यासाहेब खाडे, बंडु केकान, त्रिंबक पवळ, सोमनाथ पोटे, गोरक्षनाथ खाडे महाराज, शेषराव केकान, नागनाथ केकान, दत्तात्रय पोटे, संदीप खाडे, सुशील पोटे, बळी ठोंबरे, प्रभाकर पोटे, प्रवीण बेरे, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.