When will Hutattam express stop at Jeur railway station Passengers are leaving hanging on the door

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या सोलापूर- मुंबई मार्गावरील जेऊर स्थानकावर ‘हुतात्मा एक्स्प्रेस’सह अन्य रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी अनेकवेळा निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. ही गाडी थांबत नसल्याने पुणे, दौंडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. हुतात्मा एक्स्प्रेस सोलापूर येथून सुटते पण जेऊरला आरक्षित तिकीट करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे सांगत याठिकाणी थांबा मिळत नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेतच परंतु यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील व्यापारिक दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा या बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहक, व्यापारी, कामगार आणि प्रवाशांना न्याय देण्याची गरज आहे. या स्थानकावर दिवसेंदिवस प्रवासी वाढत आहेत. रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेसला कायमचा थांबा द्यावा आणि नंतर किती प्रवासी जेऊरहून प्रवास करतात याची प्रचिती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

जेऊर येथे थांबणारी हैद्राबाद एक्स्प्रेसमध्ये जास्त प्रवासी जेऊर स्थानकावरून ये- जा करतात. हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस या गाडीला स्लीपर कोच कमी केले असून 2 स्लीपर कोच सद्यस्थितीत आहेत. त्यामुळे स्लीपर कोचचे गर्दी व जनरल डब्यांची गर्दी जेऊर स्थानकावर आहे. त्यामुळे प्रवासी एसी कोचमध्ये सुद्धा चढतात व दारामध्ये लटकून जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या गर्दीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेळोवेळी प्रवासी संघटनेने ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे तरीही प्रशासन यावर ठोस भूमिका घेत नाही, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांचे हाल होत आहेत, दरम्यान, प्रवासी संघटना, रेल्वे प्रवासी, नागरिक, आमदार, खासदार, रेल्वे प्रशासनाला विनंती तसेच तक्रारी करून, निवेदने देऊन, आंदोलनाचे इशारे देऊन जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण, रेल्वे प्रशासनास जाग आली नाही. जेऊर हे करमाळा, जामखेड, परांडा, या तालुक्यांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, त्याचा विकास अमृत भारत योजनेतून होत असून, एक्स्प्रेस गाड्या येथे थांबवाव्यात, यासाठी आंदोलन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

हुतात्मा इंटरसिटी थांब्यासाठी खासदारांनी केला होता पाठपुरावा
हुतात्मा एक्स्प्रेस थांबविण्यासह विविध अडचणींबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर विभाग, मध्य रेल्वे व रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा वारंवार पाठपुरावा केला परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील प्रवाशांचे म्हणणे आहे. असंख्य ग्राहक, प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी वर्ग, पुणे, मुंबई कडे दररोज ये जा करतात.त्यामुळे जेऊरला हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा मिळणे आवश्यक असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *