करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘विरोधकांकडून माझ्यावर फक्त राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा अस्मितेचा विषय असून तो सहकारी तत्त्वावरच राहणार आणि माझ्या ताब्यात दिल्यास सक्षमपणे सुरु करणार आहे,’ असा विश्वास माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिला आहे.
वीट येथे माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनलची प्रचारसभा झाली. माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना सभासदांनी ताब्यात दिल्यास कामगार, ऊस वाहतूकदार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे. पण प्रश्न सोडवल्यानंतर आपले राजकारण अडचणीत येऊ नये म्हणून विरोधकांकडून माझ्याबद्दल बिनबुडाचे आरोप करायला सुरु केले आहे.’
‘आदिनाथ कारखाना हा योग्य नियोजन झाले तर चांगला सुरु होणार आहे. याकडे फक्त राजकारण म्हणून पाहू नका तर आपल्या अर्थकारणाशी संबंधित हा कारखाना आहे. याबाबतचे सर्व प्रश्न आपण सोडवणार आहे. माझा कारखाना मी विकलेला नाही’, असेही माजी आमदार शिंदे यांनी सांगितले. अडचणीतून कारखाना बाहेर कसा निघू शकेल आणि उत्पादन कसे वाढेल याची माहिती,’ माजी आमदार शिंदे यांनी दिली. विरोधकांवर त्यांनी टीकाही केली.