Sri Kamaladevi Kanya Vidyalaya celebrates Independence DaySri Kamaladevi Kanya Vidyalaya celebrates Independence Day

करमाळा (सोलापूर) : शहरातील विविध संस्था संघटना सरकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. श्री कमलादेवी कन्या विद्यालयात यानिमित्ताने विविध कार्यक्रम झाले. यामध्ये विद्यार्थिनींनी प्रभात फेरी, देशभक्तीपर गीते, खाऊ वाटप इत्यादीचा समावेश होता. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक घनश्याम गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव (जि. अहमदनगर) येथील लेखापरीक्षक सहकारी संस्था माणिकराव सोनटक्के व प्रगत माध्य व उच्च माध्य विद्यालय नवी पेठ अहमदनगर येथील प्रयोग सहाय्यक कल्पना खांदाट उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापिका मुक्ता शेलार यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक गणेश चिवटे, महेश परदेशी, प्रवीण गायकवाड, शामराव पुराणिक, सुनील सूर्यपुजारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट शिंदे यांनी केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित सीताबाई भगवान परदेशी शाळेत संस्थेचे संचालक महेश परदेशी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक सुनिल सुर्यपुजारी, घनशाम गांधी, प्रवीण गायकवाड उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *