करमाळा (सोलापूर) : कोर्टी जिल्हा परिषद गटात भाजपने उमदेवारी दिल्यास निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे मीनाक्षी पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे. त्या सूर्यकांत पाटील यांच्या पत्नी आहेत.
पोमलवाडीचे सूर्यकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. त्यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती व श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले होते. याशिवाय करमाळा विधानसभेच्या एका निवडणुकीतही ते अखंड शिवसेनेचे उमदेवार होते. मीनाक्षी पाटील यांनीही यापूर्वी अखंड शिवसेनेच्या माध्यमातून कोर्टी गटात निवडणूक लढवली होती. त्यांचे सासरे कै. पोपट पाटील यांनीही करमाळा पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले होते. मीनाक्षी पाटील यांनी या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
