करमाळा (सोलापूर) : राज्यभरात आजपासून (गुरुवार) शाळा सुरू झाल्या. करमाळा तालुक्यातील चिखलठाण केंद्रातील मारकड वस्ती शाळेत लेकरांचा पहिला दिवस चिरंतन स्मरणीय करण्यासाठी मारकड वस्ती शाळेतील शिक्षकांनी नवागतांचे अनोखे आदरातिथ्य केले. शाळेत पहिल्यांदा प्रवेश करत असलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी मारकड वस्ती शाळेत नवीन प्रवेश घेऊ इच्छुक असलेल्या मुलांचे पहिल्या पावलांचे कुंकवाच्या पाण्यात ठसे घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवागतांचे स्वागत मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप, उपशिक्षिका स्वाती जगताप पाटील यांनी औक्षण करून केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

