करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिलमेश्वर येथे ‘वारसा मि चळवळीचा’च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवकचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘आधुनिक चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात दिलमेश्वर येथेनु सुरू होत आहे’, असे कांबळे यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांनी कांबळे यांच्याकडे पाण्याचा प्रश्न मांडला. त्यावर त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली. त्यावर दोन दिवसांत पाणी सुरु नाही झाले तर आम्हाला वेगळी भुमिका घ्यावी, लागेल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. यावेळी विशाल लोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन पठाण यांनी केले.

सतिश राक्षे, वैभव मस्के, अशोक नगरे, प्रकाश राक्षे, विनोद मारकड, राजेंद्र मल्लाव, नितीन मोरे, विजय शेवंते, रेश्मा राक्षे, सुवर्णा नगरे, विद्या मारकड, जुलेखा, उषा चव्हाण, पठाण, बायसाबाई राक्षे आदी उपस्थित होते. अतुल राक्षे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
