सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये व योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, याबाबतचा सरकार निर्णय रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
या निर्णयामध्ये अर्जदार व संबंधित कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाने पार पाडावयाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थींना मान्यता प्रदान करण्याबाबतची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय संनियंत्रण समित्या स्थापन करून या समित्यांचे कार्य व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.