Veteran actor Dharmendra holds the contract at his grandson weddingVeteran actor Dharmendra holds the contract at his grandson wedding

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मुलगा करण १८ जूनला विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीचे समारंभ सुरू आहेत. नुकताच करण व द्रिशाचा संगीत समारंभ झाला. यावेळी अनेक कलाकारांबरोबर धर्मेंद्र यांनीही हजेरी लावली. करण देओल व द्रिशा आचार्यच्या संगीत समारंभाला रणवीर सिंगने हजेरी लावली. त्याने सनी देओलला मिठी मारून मुलाच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

धर्मेंद्र यांनी नातवाच्या संगीत समारंभाला फक्त हजेरीच लावली नाही, तर डान्सही केला. धर्मेंद्र यांनी नातू करण व राजवीरबरोबर ‘यमला पगला दिवाना’ या गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या डान्सला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सनी देओलने करणच्या संगीत कार्यक्रमासाठी ‘गदर’मधील तारा सिंगसारखा लूक केला होता. याच चित्रपटातील गाण्यांवर त्याने डान्स केला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *