In a show of strength, Nimbalkar and Satpute filed their application in the presence of Deputy Chief Minister Fadnavis

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर व माढा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांनी आज (मंगळवारी) शक्तीप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले आहेत. श्री छत्रपती संभाजी महाराज चौक येथून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. चार हुतात्मा चौक येथे या पदयात्रेचा समारोप झाला. येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांनी तर माढा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपसह महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार गट), रासप, रयत क्रांती, शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट), आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोलापुरात विजय संकल्प रॅली काढण्यात आली होती. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, शंभूराजे जगताप आदी उपस्थित होते. कडक उन्हात निघालेल्या या रॅलीत हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

In a show of strength, Nimbalkar and Satpute filed their application in the presence of Deputy Chief Minister Fadnavis

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *