करमाळा (सोलापूर) : गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे वसू बारसनिमित्त आज (गुरुवारी) गाईंची पूजा करण्यात आली. यावेळी करमाळा तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांचेसह गोशाळेचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळेस गो- मातेला बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, गूळ याचा नैवेद्य दाखवून मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
गोसेवा समितीचे जगदीश शिगची यांनी डॉक्टरांचे व गो – मातेचे महत्व सांगून आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष खाटेर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गोशाळा स्थापन झाल्यापासून गो मातेची सेवा करणारे पोपटराव काळदाते व त्यांचा परिवार यांच्या वतीनेही गोमातेची पूजा करण्यात आली. या वेळेस माजी नगरसेविका संगीता खाटेर, नितीन दोशी, अनिलशेठ सोळंकी, दिनेश मुथा, वैभव दोशी, आशिष बोरा, जीवन संचेती, प्रीतम दोशी, संतोष बन्सीलाल कटारिया, गणेश बोरा, मार्केट कमिटीचे ढाणे, अर्बन बँकेचे कुलकर्णी, स्पर्श सोळंकी, प्रीतम राठोड, गिरीश शहा, विजय बरीदे, चंद्रकांत काळदाते, ह. भ. प. अमोल महाराज काळदाते उपस्थित होते.