करमाळा (सोलापूर) : मकाई कारखान्याच्याबाबतीत २०२२- २३ मधील एफआरपी थकवल्याप्रकरणी कारखान्यावर बोजा चढवण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. याबाबत कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची यादी लेखापरीक्षक वर्ग १ यांच्याकडून सादर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकार्यांना प्रादेशीक सहसंचालक पांडुरंग साठे यांनी पत्र दिले आहे, अशी माहिती प्रा. रामदास झोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
प्रा. झोळ यांनी म्हटले आहे की, शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २६ कोटी ३२ लाख १८ हजार तसेच त्यावरील व्याज देणे आवश्यक आहे.
एफारपी थकवल्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाणार आहे. याची यादी द्वितीय विशेष लेखापरीक्षक बी. यू. भोसले यांनी प्रादेशिक सहसंचालक यांना माहिती दिली आहे, असेही प्रा. झोळ यांनी म्हटले आहे. कामगारांची देणी नाहीत, शिल्क साखर नाही, शेतकर्यांचे देणी नाहीत. यावर लेखापरिक्षकांनी ताषोरे ओढले आहेत. बागल गटाला हा दणका मानला जात आहे. ‘मकाई साखर कारखान्याने साखर विक्रीतून शेतकऱ्यांचे, कामगारांचे देणी दिली नाहीत.’ त्यामुळे हा साखर घोटाळा असल्याचा आरोप प्रा. झोळ यांनी केला आहे.