करमाळा (सोलापूर) : जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी विकास गरड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी १००० संविधानच्या प्रतीचे वाटप करणार असल्याचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके यांनी सांगितले.
निलेश पाटील म्हणाले, संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा, लिहण्याचा व मतांचा अधिकार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशसंपादन केले. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत. शिका, संघर्ष करा व संघटित व एकजुटीने कार्य करा, असे डॉ. आंबेडकरांचे विचार आहेत. आबासाहेब झाडे, निलेश पाटील, धन्यकुमार गारुडे, बालाजी गावडे, अतुल निर्मळ, बाळासाहेब तोरामल, विकास गरड, किशोर कदम, पांडुरंग घाडगे, पिंटू जाधव, सचिन गारुडे, सचिन शेळके, धनंजय शिरसकर, हेमंत शिंदे, बाळासाहेब गरड, नयन गरड, राजेश ननवरे, अजित उपाध्ये, पप्पू गावडे, वैभव शिरसकर, तुषार शिरसकर, आजित माने उपस्थित होते.


