करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील फिसरे येथे शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी राष्ट्रवादीचा ‘शेतकरी मेळावा व जाहीर प्रवेश’ होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते यावेळी विविध विकास कामांचे भूमिपूजनही होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप हे असणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आमदार जगताप व आमदार शिंदे हे एकाच मंचावर येणार आहेत. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

