Policy to many of foreign education under one roof tourism

पुणे : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’मध्ये एकाच छताखाली अनेक संधी व पर्याय उपलब्ध झाल्या. ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे आयोजन करण्यात आले. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील जवळपास 40 हून अधिक सर्वोत्तम विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता आल्याने विद्यार्थ्यांनी येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विद्यार्थी आणि पालकांना याठिकाणी निशुल्क मार्गदशन मिळाले.

12 वी बोर्डाच्या परीक्षा मागील महिन्यात  संपल्या असून पदवी परीक्षा देखील संपत आल्या आहेत. या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र कोठे योग्य संधी उपलब्ध आहेत? एज्युकेशन लोन कसे मिळू शकते का? परदेशी जाण्यासाठी कोणत्या स्कॉलरशिप असतात? हे सगळे प्रश्न विद्यार्थ्या सोबत त्यांच्या पालकांना देखील पडतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने  ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ भरवण्यात आले आहे. या फेयरचे हे 14 वे वर्ष आहे. यावेळी ‘स्टडी स्मार्ट’च्या नवीन संकेतस्थळाचे आणि  लोगोचे अनावरण ‘स्टडी स्मार्ट’चे संचालक चेतन जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *