करमाळा (सोलापूर) : आयोध्येतील राममंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळा अगदी काय दिवसांवर आला आहे. तसा रामभक्तांमध्ये उत्साह वाढत आहे. करमाळा येथेही हा सोहळा पहाता यावा म्हणून रामभक्तांकडून जयंत तयारी सुरु आहे. २२ जानेवारीला हा सोहळा होणार असून याच पर्श्वभूमीवर करमाळ्यातील सुभाष चौकाचे श्रीराम चौक असे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या चौकात आता वीस बाय वीसचा भगवा ध्वज लावण्यात आला आहे. हा ध्वज सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
राममंदिराचा लढा गेले कित्येक वर्षे चालल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होत असताना, या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सोहळा करमाळ्यातील नागरिकांना पहाता यावा यासाठी मोठी तयारी सुरु आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अगरवाल यांनी त्याच निमित्ताने सुभाष चौकाचे श्रीराम चौक असे नामांतर करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्याधिकारी बालाजी लोंढे आदींना त्यांनी निवेदन दिले आहे.
22 जानेवारीला नियोजित या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन सुरु असून त्याच दिवशी या चौकात करमाळ्यातही कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जात आहे. उत्सव समितीच्या वतीने चौकात लावण्यात आलेला ध्वज सर्वांचे लक्ष वेधत आहे. या सोहळ्यासाठी सर्वांना निमंत्रित केले जात आहे.