करमाळा (सोलापूर) : ‘तांबोळी ट्रस्टच्या माध्यमातून उर्दू शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याचा आदर्श घेणे आवश्यक आहे. या शाळेत मुलींची संख्या जास्त असल्याचा आनंद आहे,’ असे प्रतिपादन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले आहे. करमाळा शहरातील नगरपालिकेच्या नामदेवराव जगताप उर्दू शाळेत आज (मंगळवारी) सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उदघाटन झाले. तहसील शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले.
दिलासादायक! करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आता २४ तास सिझेरियन व इतर शस्त्रक्रिया, भूलतज्ञची नियुक्तीमुळे दिलासा
नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, माजी नगरसेवक संजय सावंत, हाजी हाशमोद्दीन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताफशेठ तांबोळी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अशफाक सय्यद, राष्ट्रवादीचे अमीर तांबोळी, करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, मुजावर उपस्थित होते.
Karmala Politics अजित पवारांच्या आवाहनावर भाजपच्या रश्मी बागलांचा पलटवार! मकाईवरून करमाळ्यात राजकारण पेटले
अल्ताफ तांबोळे म्हणाले, करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. कोरोना दरम्यान नागरिकांना मदत केली होती. दिवाळीच्या वेळी मिठाईचे वाटप किंवा रमजान ईदच्यावेळी शिधा वाटप व रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन फारुक जमादार यांनी केले.
मकाई सभासदांच्या मालकीचा; सर्वांच्या सहकार्याने काही काळात हा कारखाना पुनर्वैभव प्राप्त करेल
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, तांबोळी ट्रस्टच्या माध्यमातून उर्दू शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याचा आदर्श घेणे आवश्यक आहे. या शाळेत मुलींची संख्या जास्त असल्याचा आनंद आहे. यावेळी उपस्थित यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान झाला. शायस्ता शेख, लायजा कुरेशी, मिस्बाह कुरेशी, इकरा मजहर शेख, जोया कुरेशी, हादीया जनवाडकर यांचा सन्मान झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर सिकंदर शेख, सोहेल पठाण, मुस्तकीम पठाण, समीर शेख, नदीम शेख, आयान बेग, वाजीद शेख, कादर शेख, इंदाज वस्ताद, अफरोज पठाण, मौलाना सिकंदर, अमीन बेग, असिम बेग, अकबर बेग, समीर वस्ताद, अकील शेख, शुकूर शेख आदी जणांनी परिश्रम घेतले.