Review meeting on Thursday in Karmala regarding possible fodder shortage and water shortageReview meeting on Thursday in Karmala regarding possible fodder shortage and water shortage

करमाळा (सोलापूर) : पावसाळा संपत आला तरी करमाळा तालुक्यासह राज्यामध्ये पर्जन्यमान अत्यल्प आहे. त्यामुळे चारा टंचाई व पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते त्या अनुषंगाने सर्व विभागांची आढावा बैठक आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ३१) सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय करमाळा येथे आयोजित केली असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी दिली आहे.

आढावा बैठकीसाठी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, लघु पाटबंधारे मोडनिंब/ करमाळा, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती करमाळा, सहाय्यक निबंध सहकारी संस्था करमाळा, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग ,अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, उपअभियंता जलसंधारण, उपअभियंता जलसंपदा, पशुसंवर्धन अधिकारी, उपअभियंता पाटबंधारे उपविभाग ,अभियंता पाटबंधारे विभाग, कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12, भीमा सिंचन उपसा उपविभाग क्रमांक 1 व कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 7 आदी अधिकारी मंडळींना निमंत्रित केले असून संभाव्य चारा टंचाई व पाणी टंचाईच्या अनुषंगाने यामध्ये चर्चा होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *