करमाळा (सोलापूर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धां यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात होणाऱ्या आहेत. ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.
विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, भारत महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अनंत शिंगाडे, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण देशमुख उपस्थितीत राहणार आहेत. स्पर्धेसाठी विद्यापीठातून ३० संघ सहभागी होणार आहेत. यापैकी २० संघ मुलांचे तर १० संघ मुलींचे असणार आहेत. या स्पर्धा बाद पद्धतीने खेळविल्या जाणार आहेत आणि यातून विद्यापीठाचा संघ निवड होणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धा मॅटवरती होणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा, एनएसएस, एनसीसीचे स्वयंसेवक सज्ज झालेले आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील व महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अतुल लकडे यांनी दिली.