करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने बाजार समिती बिनविरोध झाली होती. त्यानंतर आज (मंगळवार) विजयी दशमीदिवशी करमाळा बाजार समिती येथे सभापतीपदाची निवडणूक झाली. त्यात जगताप यांची निवड झाली आहे. उपसभापतीपदी शैलजा मेहर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
करमाळा बाजार समितीची 18 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्या सर्व 18 जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये पाटील व बागल गटाला प्रत्येकी दोन- दोन जागा मिळाल्या होत्या. व्यापारी गटात दोनच अर्ज दाखल झाल्याने जगताप गटाच्या दोन जागा सुरुवातीला बिनविरोध झाल्या होत्या. सावंत गटाची हमाल तोलारमधील एक जागा बिनविरोध झाली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोहिते पाटील यांनी जगताप, पाटील व बागल गटाचा समजोता केला त्यात सर्व अर्ज मागे निघाले. शिंदे गटाने सुरुवातीलाच जगताप यांना पाठिंबा देत अर्ज मागे घेतले होते.
हे आहेत बाजार समितीचे संचालक : सहकारी संस्थामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, विलास गुंडगीरे, सागर दोंड, जनार्धन नलवडे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे. महिला राखीव : साधना पवार, शौलजा मेहर. इतर मागासवर्ग : शिवजी राखुंडे. भटक्या जमाती : नागनाथ लकडे. ग्रामपंचायत : कशीनाथ काकडे, नवनाथ झोळ, बाळू पवार, कुलदीप पाटील. व्यापारी प्रतिनीधी : मनोज पितळे व परेशकुमार दोशी. हमाल तोलार : वालचंद रोडगे.