शेलगाव येथे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोष

Jubilation after Nimbalkar candidature was announced in Shelgaon

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेलगाव वा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून व घोषणा देऊन हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपचे ‘गाव चलो अभियान’चे जिल्हा संयोजक पिक विमा तक्रार निवारण समितीचे सदस्य लक्ष्मण केकान, सुधीर साळुंखे, युवराज काळे पाटील उपस्थित होते. केकान म्हणाले, भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत. या विजयामध्ये करमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल तसेच करमाळा तालुक्यातील पाण्याची प्रश्न, रस्त्याचा प्रश्न यावर खासदार निंबाळकर यांनी गांभीर्याने विचार करून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे खासदार निंबाळकर यांच्या विजयामध्ये करमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *