Jubilation from BJP in Karmala after MP Ranjitsinh Naik Nimbalkar candidature was announced in Madha

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदार संघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे करमाळ्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. करमाळा शहरातुन हलग्या व फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालय- सुभाष चौक- जय महाराष्ट्र चौक- भवानी नाका ते सुभाष चौक अशी पदयात्रा काढत आंनदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस सरपंच काकासाहेब सरडे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, जिल्हा चिटणीस विनोद महानावर, माढा लोकसभा सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे, उपसरपंच अमोल पवार, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे, अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, किरण शिंदे, बिभीषण गव्हाणे, शाम सिंधी, नरेंद्र ठाकूर, भैय्याराज गोसावी, गणेश महाडिक, जयंत काळे पाटील, वसीम सय्यद, गणेश माने उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *