श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धनसाठी पुण्यातील उद्योजकाकडून लाखाची मदत

Kamladevi Madinr An entrepreneur in Pune has donated Rs one lakh

करमाळा (सोलापूर) : श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी भक्तांकडे मदतीचे आवाहन केले होते. या आव्हानास प्रतिसाद देत पुण्यातील उद्योजक नितीन तापडिया यांनी एक लाखाची मदत केली आहे.

याचा धनादेश प्राप्त झाला असून यानिमित्त त्यांचा सत्कार विश्वस्त सुशिल राठोड, व्यवस्थापक अशोक गाठे, लक्ष्मण हवलदार, प्रविण हिरगुडे यांनी केला. यावेळी तापडिया यांचे सहकारी सतीश भुकन, श्री. लष्कर उपस्थित होते. या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संपर्क : अशोक गाठे मो. ९४०४७०८९२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *