करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी साखर कारखान्याचा आठवा बॉयलर अग्नीप्रदीपन आज (शनिवारी) आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामन बदे यांच्या हस्ते झाले. माजी सभापती चंद्रहास निमगिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यावेळी उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष शिंदे यांनी शेतकऱ्यांचे बील देण्यास उशीर झाल्याची खंत व्यक्त करत यावर्षी जिल्ह्यातील कारखान्याबरोबर उसाला दर देणार असल्याचे सांगितले. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास दर देऊ, असे सांगून मागील गळीत हंगामातील ऊसाचे पेमेंट ३१ जानेवारीपर्यंतचे २३०० रु व १ फेब्रुवारी पासूनचे पुढील पेमेंट जाहीर केलेल्या वाढीव १०० रुपये अनुदानासह २४०० रु प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्याला जमा केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे आपण दीपावलीसाठी आणखी १०० रुपयाचा हप्ता काढणार असल्याचे सांगितले.
कारखान्याचे जनरल मॅनेजर भोसले यांनी प्रास्ताविक केले. भास्कर भांगे, नानासाहेब निळ, शहाजी झिंजाडे, तात्या सरडे, विनय ननवरे, मानसिंग खंडागळे, अनिल पवार, अश्पाक जमादार, बलभीम जाधव, धनंजय शिंदे, संजय आरकिले, बंडू माने, लक्ष्मण सरडे, पत्रकार अश्पाक सय्यद, दस्तगीर मुजावर, पत्रकार अशोक मुरूमकर, विशाल घोलप, सुनील भोसले, समाधान भोगे, प्रशासकीय अधिकारी जगताप आदी उपस्थित होते.