There will be two iterations of the Kukdi project MLA Sanjya Shinde attempt for the third revision beginsThere will be two iterations of the Kukdi project MLA Sanjya Shinde attempt for the third revision begins

करमाळा (सोलापूर) : कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता. 20) पुणे येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पाची दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले आहे. डिसेंबर व मार्चमध्ये ही आवर्तने सुटणार असून मेमध्ये तिसरे आवर्तन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला सांगितले आहे.

आमदार शिंदे म्हणाले, 15 डिसेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 असे आवर्तन प्रस्तावित असून दुसरे आवर्तन 1 मार्च 2024 ते 9 एप्रिल 2024 असे आहे. तर तिसरे आवर्तन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. डिसेंबरमध्ये सुरू होणाऱे आवर्तन 15 डिसेंबर ऐवजी 1 डिसेंबर पासून सुरु करावे, अशी मागणी आहे. सदर आवर्तन टेल टू हेड मिळणार असून करमाळा तालुक्याला 13 दिवस सलग पाणी मिळणार आहे. या पाण्याचे मोजमाप करताना करमाळा तालुक्याला पाणी पोहोचल्यानंतरच त्याचे दिवस मोजण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *