करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील कंदर येथे काल (बुधवारी) रुग्णालयात मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) केम बंद ठेवले आहे. कंदरमध्ये यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कंदरमध्ये उमेश इंगळे हे एका रुग्णालयात उपचार घेत होते. तेव्हा तेथे अमर फराडे हे आले. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. दोघांवरही उपचार सुरु आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी कंदर ग्रामस्थांनी स्व इच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कंदरसाठी ही घटना चुकीची आहे, अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
‘ती’ हाणामारी वाळूवरून! याकडे कोण गांभीर्याने पहाणार का?