करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयात असलेला ऑक्सिजन प्लांट ते रुग्णालयात रुग्णांना होणार ऑक्सिजन पुरवठ्याचा पाईप चोरट्याने चोरून नेला आहे. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणातरुग्णालयातील कनिष्ठ लिफीक सुरेश आगलावे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. चोरी झालेल्या कॉपरच्या पाइपची किंमत साधणार २७०० रुपये आहे. पहाटे ही चोरी झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय गजानन गुंजकर यांच्या कक्षात असलेल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. चोरट्याने हिसका मारून हा पाईप चोरून नेला आहे.

