करमाळा (सोलापूर) : रयत क्रांतीच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी कंदरचे राजकुमार सरडे यांची निवड झाली आहे. रयत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत व युवा नेते सागर खोत यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचा करमाळ्यात सुभाष चौकात सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक महादेव फंड, तालुका संपर्क प्रमुख राजकुमार माने, कार्याध्यक्ष संतोष निंबाळकर, दिलदार मुलाणी, अक्षय माने, पत्रकार अशोक मुरुमकर, पत्रकार सुनिल भोसले, नरेंद्रसिंह ठाकूर, शिवनाथ घोलप, अतुल बोकन आदी यावेळी उपस्थित होते.