करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील देवळालीत ऑक्टोबर २०२४ मध्ये वीज कोसळून ठार झालेल्या एका व्यक्तीच्या वारसाला महसूल प्रशासनाने चार लाखाची मदत दिली आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) तहसील कार्यालय येथे हा धनादेश देण्यात आला आहे. १७ ऑक्टोबरला अंगावर वीज कोसळल्याने चांगदेव बाबू कानगुडे (वय ६०) यांचा मृत्यू झाला होता.
कानगुडे हे शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते. गुळसडी रस्त्याच्या बाजूला गुरे चारत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा प्रकार इतर गुऱ्हाक्यांच्या लक्षात आला होता. त्यांना रुग्णलयात दाखल केले होते. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. सरकार नियमानुसार त्यांना महसूल विभागाने मदत दिली आहे. त्यांच्या पत्नी द्रौपदी कानगुडे यांनी हा धनादेश स्वीकारला. यावेळी समीर पटेल उपस्थित होते.